नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसापासून स्थिर असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांना कच्च्या तेलावर दिलासा मिळाला असला तरीही आज या कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले असून दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दरम्यान, सरकारने पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनावरील निर्यात शुल्कात वाढ केली आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. सरकारने पेट्रोलच्या निर्यातीवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवर 12 रुपये प्रति लिटरने वाढ केली आहे. याशिवाय एटीएफ निर्यातीवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रति लिटर 6 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर
कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर
लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लीटर
जयपुरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल93.72 रुपये प्रति लीटर
पटनामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लीटर
बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल87.89 रुपये प्रति लीटर
भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लीटर
चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लीटर
बृहन्मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.53 रुपये आणि डिझेलचा दर 97.45 रुपये प्रति लिटर.
पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.93 रुपये तर डिझेलचा दर 96.38 रुपये प्रति लिटर.
नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर 95.73 रुपये प्रति लिटर.
नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर 95.92 रुपये प्रति लिटर.
कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर 95.54 रुपये प्रति लिटर.