नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 17,092 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर यादरम्यान 29 मृत्यूची नोंद झाली आहे. देशात दैनंदिन कोरोना पॉझिटिव्हीटी दर 4.14 टक्के इतका आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 14684 लोक कोरोनाने बरे झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 4189, केरळमध्ये 3724 आणि तामिळनाडूमध्ये 1321 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत 4,28,51,590 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

तसेच, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक ४ मृत्यू झाले आहेत. त्यानंतर दिल्लीत ३, पंजाब आणि केरळमध्ये प्रत्येकी २ जणांचा मृत्यू झाला. बिहार, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये 1-1 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय केरळमधील 13 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, 4 हजार 189 जणांनी कोरोनावर मात केली. पुढील 15 दिवसांत रुग्णसंख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात सध्या 23 हजार 996 रुग्ण उपचाराधीन आहेत.