मुंबई : काल राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. या पदामुळे फडणवीस नाराज असल्याचे सुद्धा म्हणले जात आहे. तर फडणवीसांच्या शुभेच्छांच्या बॅनरवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा फोटा गायब होता. तर उपमुख्यमंत्रीपदावरून भाजप कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीनाट्यावर देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्यानेच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याची कबुली दिली आहे. तसेच फडणवीस कार्यकर्त्यांना सूचना देत म्हणाले, ‘२०२४ च्या कामाला लागा. अडीच वर्षात सर्व रखडलेली काम मार्गी लावू. कुणीही कसलीही काळजी करायचं कारण नाही. हे सरकार आपलं आहे, त्यामुळे कुणीही नाराज होऊ नका. सर्वांनी आता जनतेसाठी काम करा’.
