मुंबई: राज्याच्या राजकारणात मागील जवळपास १० दिवसांच्या अनेक धक्कादायक घडामोडीनंतर, काल अखेर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शिंदे यांच्या नेतृत्वात आता राज्यात नवे सरकार स्थापन झाले असले तरी या सरकारला ४ तारखेला फ्लोर टेस्टला सामोरे जावे लागणार आहे.
४ तारखेच्या फ्लोर टेस्टला जाण्याआधीच नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमच्याकडे १७० आमदारांचे समर्थन असून आमचे सरकार आरामात बहुमत सिद्ध करेल. तसेच, राज्याबाहेर असणारे सर्व आमदार उद्या मुंबईला येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, शिंदे सरकार विधानसभेच्या विशेष अधिवेशनात फ्लोर टेस्टला सामोरे जाणार आहे. त्यामुळे आता ४ तारखेला बंडखोर आमदांसह अपक्षांना आपल्या बाजुने वळविण्याऱ्या शिंदे यांना फ्लोर टेस्टमध्ये बहुमत मिळणार का याच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.