मुंबई : राज्यातील विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन येत्या तीन जुलैपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी सभापतीपदासाठी आज अर्ज दाखल केला. याशिवाय, राहुल नार्वेकर हे विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
तसेच, या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत शनिवार (ता. २जूलै) पर्यंत दुपारी 12 वाजे पर्यंत ठेवण्यात आली आहे. या पदासाठीची निवड रविवारी (ता. ३जूलै) सभागृहात होणार आहे.

भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी पक्षात अनेक जेष्ठ नेते असताना कुलाब्याचे आमदार राहूल नार्वेकरांना भाजपकडून संधी देण्यात आली.