मुंबई : काल राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. परंतु, या पदामुळे फडणवीस नाराज असल्याचे देखील बोलले जात होते. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले.
आज पाटील म्हणाले, ‘ एकनाथ शिंदे यांनी अस्वस्थ असलेल्या आमदारांना बाहेर काढले. तेव्हा आम्ही म्हणालो ही आमची भूमिका नाही. या अस्वस्थतेमुळे हे सरकार पडले. आम्ही आधीच म्हणालो हे अंतर्गत कलहाने सरकार पडेल. त्यागामध्ये आनंद व्यक्त करणे हे हिंदुत्व आहे. फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकत होते पण हिंदुत्वासाठी आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. प्रशासनाची आवश्यकता असल्याने एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आग्रह केला होता.

त्यानंतर पक्षश्रेष्ठींशी बोलले आम्ही निर्णय पक्ष श्रेष्ठीना विचारतो. यासाठी मन मोठे लागते देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवले. हिंदूंना आनंद देणारे सरकार आले आहे. अमित शहांमध्ये आणि आमच्यात सलोख्याची नाती आहेत. मत्सर वाटतो अशा लोकांनी केलेल्या या स्टोऱ्या आहेत, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.