Latest Marathi News

BREAKING NEWS

दोन दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू ;दुचाकीवरील दोघे जखमी

0 287

 

पुणे: कात्रज परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले.कात्रजमधील शनी मंदिरासमोर भरधाव दुचाकी घसरुन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गोवर्धन उत्तम शिंदे (वय ३७, रा. विजयलक्ष्मी अपार्टमेंट, आगम मंदिर पायथा, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

Manganga

दुचाकीस्वार शिंदे भरधाव वेगाने मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास कात्रजमधील शनी मंदिर परिसरातून जात होता. भरधाव दुचाकी घसरून दुचाकीस्वार शिंदे गंभीर जखमी झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिंदेचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.

कात्रज चौकातील स्मशानभूमीजवळ झालेल्या आणखी एका अपघातात दुचाकी घसरुन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. प्रमोद गंगाधर छकडे (वय ३०, रा. टिळेकरनगर, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी शिवराम कैलास मराठे (वय २६) आणि राहुल तुकाराम खरात (वय ३४) जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीस्वार प्रमोद आणि त्याचे मित्र शिवराम आणि राहुल कात्रज चौकातील स्मशानभूमी परिसरातून जात होते. त्या वेळी दुचाकी घसरुन अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार प्रमोद गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!