Latest Marathi News

BREAKING NEWS

शिवसेनापक्षाचे प्रमुख यांचे सरकारला भावनिक आवाहन…

0 525

मुंबई : नव्यानं स्थापन झालेल्या राज्यातील शिंदे सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मुंबईतील मेट्रो कारशेडचा ठाकरे सरकारचा निर्णय बदलून तो पुन्हा आरेमध्ये करण्याला मान्यता देण्यात आली. या बदललेल्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सरकारला भावनिक आवाहनही केलं आहे. शिवसेनाभवनात पत्रकारांशी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज पहिल्यांदा तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल. कारण मला आज खरंच दुःख झालेलं आहे. माझ्यावर राग आहे ना तर माझ्यावर राग काढा, माझ्या पाठीत वार करा. पण मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका. माझा राग मुंबईवरती काढू नका.

Manganga

आरेचा निर्णय नव्या सरकारनं बदलला याचं मला खरोखर दुःख झालेलं आहे. आरे हा कोणाचा खासगी प्लॉट नाही. तिकडे कुठल्याही बिल्डरला आपण आंदन दिलेलं नाही. पर्यावरणासाठी आवश्यक असलेली वनराई होती, त्यावर एका रात्रीत झाडांची कत्तल झाली.

केंद्रात आणि राज्यात आता तुमचंचं सरकार आहे. त्यामुळं आरेचा निर्णय रेटू नका. कारण कांजूरमार्गला कारशेड झाल्यास ही मेट्रो पुढे बदलापूर अंबरनाथ पर्यंत जाऊ शकते. हा माझ्या मुंबईकरांच्यावतीनं आग्रह आहे, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!