Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, शुक्रवार १ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 663

मेष:-
मानसिक अस्वस्थता काही प्रमाणात जाणवेल. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. मनात नसत्या चिंतांना थारा देऊ नका. क्षुल्लक कारणावरून वाद वाढवू नका. सामुदायिक बाबींचे भान राखावे.

 

वृषभ:-
मनातील इच्छा पूर्ण होईल. तुमची आर्थिक अडचण दूर होईल. स्थावरच्या व्यवहारात अधिक लक्ष घालावे लागेल. जवळच्या मित्रांची नाराजी दूर करावी. व्यापारातून चांगला आर्थिक लाभ होईल.

Manganga

 

मिथुन:-
कामाची धांदल उडेल. आपले विचार अधिक स्पष्ट मांडण्याचा प्रयत्न करावा. मानसिक चंचलतेला आवर घालावी. योग्य व नियोजनबद्ध कामे आखावीत. गप्पांमध्ये अधिक वेळ घालवू नका.

 

कर्क:-
वैचारिक शांतता जपावी. मौजमजा करण्याकडे अधिक कल राहील. उगाचच कोणाचाही रोष ओढावून घेऊ नका. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे लागेल. कौटुंबिक खर्च आटोपता ठेवावा लागेल.

 

सिंह:-
प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अति काळजी करणे योग्य नाही. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. वातविकाराचा त्रास संभवतो. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत.

 

कन्या:-
भागीदारीतील लाभाकडे लक्ष ठेवावे लागेल. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. नातेवाईकांचे विचार जाणून घ्यावेत. तुमचा जनसंपर्क वाढेल. ओळखीच्या लोकांशी वादात अडकू नका.

 

तूळ:-
बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. पित्त विकाराचा त्रास संभवतो. सहकार्‍यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. नवीन गुंतवणूक करताना सारासार विचार करावा.

 

वृश्चिक:-
तुमची चिडचिड वाढू शकते. न आवडणार्‍या गोष्टींचा देखील स्वीकार करावा लागेल. स्वभावातील तामसी वृत्तीत वाढ होईल. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. आज वेळ चुकवून चालणार नाही.
धनू:-
कौटुंबिक बाबी जुळवून घ्याव्या लागतील. प्राथमिक स्वरुपात पुढील गोष्टींचे अंदाज बांधावेत. समोरील प्रश्न शांततेने सोडवावे लागतील. घरातील वातावरण तप्त राहील. योग्य वेळेसाठी थांबावे लागेल.

 

मकर:-
मुलांच्या बाबत आपण समाधानी राहाल. आपले मत शांततेने मांडावे. आनंदी दृष्टीकोन बाळगावा. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रवासात फार घाई उपयोगाची नाही.

 

कुंभ:-
वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. तामसी पदार्थ खाल. बोलण्याआधी सारासार विचार करावा. घरगुती वातावरण प्रसन्न राहील.

 

मीन:-
चुकीच्या कामांमध्ये हात घालू नका. हातातील कलेला वाव द्यावा. नातेवाईकांना मदतीचा हात पुढे कराल. भडक विचार नोंदवू नका. छंद जोपासण्यात वेळ घालवावा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!