मुंगेर : मुंगेर शहरातील बेकापूर परिसरात राहणाऱ्या विवेक कुमार नामक तरुणाचा नौगढी येथील मोनी कुमारी नामक तरुणीसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर आठवड्याभरानंतर नवविवाहित तरुणी नवऱ्यासोबत बांगड्या घेण्यासाठी बाजारात गेली. बांगड्या भरत असताना पतीचे दुर्लक्ष झाले. त्यानंतर संधीचा फायदा घेतआपल्या प्रियकरासोबत बोलेरो गाडीतून पळून गेली.
पत्नी प्रियकरासोबत पळून गेली असल्याची तक्रार दाखल होताच, पोलिसांनी विवाहित महिलेला शोधून काढले. तसेच तिच्या प्रियकरालाही ताब्यात घेतले आहे. दरम्यान, तरुणीच्या पतीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या तरुणीचा शोध घेतला. शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली होती. यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. 2016 पासून ते एकमेकांवर प्रेम करत होते. 5 सप्टेंबर 2020ला त्यांनी चंडिका मंदिरात लग्नही केले होते.

पण, त्यांच्या नातेवाईकांना हे लग्न मंजूर नव्हते. तसेच ते दोन्ही सोबत राहण्यासाठी परिवाराचा विरोध होता. या संपूर्ण प्रकारामुळेच एका आठवण्याआधी मोनीचे लग्न विवेक कुमार तरुणासोबत करण्यात आले होते. मात्र, लग्नाच्या आठवड्याभरातच ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली.