Latest Marathi News

“अभिनंदन! एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी…” : शरद पवारांनी केले एकनाथ शिंदेचे अभिनंदन!

0 527

मुंबई : एकनाथ शिंदे यांची आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. तसेच, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ आजच घेणार असल्याचेही जाहीर केले.

 

आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले. शरद पवारांनी शिंदे यांचे अभिनंदन करणारे एक ट्विट केले आहे.

Manganga

 

या ट्विटमध्ये पवारांनी म्हटले आहे, ‘राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो. स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे. असे वक्तव्य करत शरद पवारांनी ट्विट केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!