Latest Marathi News

दोन मुलांसह आईचा विहिरीत आढळला मृतदेह: आत्महत्या कि हत्या?

0 201

जळगाव : रांजणगाव शिवारातील एका विहिरीत दोन चिमुकल्यांसह आईचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, शिरपूर येथील मनोज पावरा हे रांजनगाव (ता. चाळीसगाव) येथे कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्यांचा २०१५-१६ मध्ये मध्यप्रदेशातील खेडी गावामधील ईला हिच्‍याशी विवाह झाला. त्यानंतर रितेश पावरा (वय ५) व महेश पावरा (वय ११ महिने) अशी दोन मुले आहेत. घरात हलाखीची परिस्थिती असल्याने पावरा दाम्पत्य ठिकठिकाणी कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र २९ जूनला रात्री साडेदहा वाजेपूर्वी रितेश व महेश पावरा या चिमुकल्यांसह पत्नी ईला मनोज पावरा (वय २५) यांचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला.

Manganga

 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी येत पाहणी केली. यावेळी एकाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्‍याने मृतदेहाला विहिरीतून बाहेर काढत पती मनोज पावरा यांनी पत्नी व एक मुलाचा तपास नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावेळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अजून विहिरीच्या तळाला तपास केला. तेव्हा दोघांचेही मृतदेह मिळून आले. अद्याप मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!