मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड करत चाळीसहून अधिक आमदार सुरुवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला घेऊन जात बंड केला. त्यामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं होते. आणि या सगळ्या राजकीय नाट्यानंतर काल राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आज 30 जून रोजी फ्लोर टेस्ट करण्याचे निर्देश दिले. राज्यपालांच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

दरम्यान, ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. हिंदुत्त्वाची भूमिका धरून ठेवली असती तर ही वेळ आली नसती अशी खोचक टीका पाटलांनी केलीय. उद्धव ठाकरे जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले नसते, तसेच त्यांनी हिंदुत्वाची भूमिका धरून ठेवली असती, तर ही वेळ आली नसती.
सरकार बनवण्याचा दावा कधी करणार त्यावर निर्णय व्हायचा बाकी आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीशी बोलून यासंदर्भात निर्णय घेऊ. अजून याबाबत कोणता निर्णय घेतलेला नाही असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.