इंफाळ: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे डोंगराळ भागात सातत्याने भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. मनिपूरमधील नोनी जिल्ह्यात बुधवारी रात्री तुपुल रेल्वेस्थानकाजवळील १०७ प्रादेशिक लष्कराच्या छावणीला परिसरात भूस्खलन झाले आहे. या घटनेनंतर लष्कराने बचावकार्य सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे २० जण अद्याप बेपत्ता आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जिरीबामला इंफाळशी जोडण्यासाठी रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे. त्याच्या सुरक्षेसाठी १०७ टेरिटोरियल आर्मीचे जवान तैनात करण्यात आले होते. बुधवारी रात्री येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले. या बचावकार्यात त्या ठिकाणी असणाऱ्या उपकरणे वापरली जात आहेत.
या घटनेनंतर सुमारे २० जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांचा शोध सुरू आहे. यामध्ये हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जात आहे, मात्र खराब हवामानामुळे बचाव पथकाला सतत अडचणी येत आहेत. काही जखमींना कॅम्पजवळून बाहेर काढून नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर गंभीर जखमींना इम्फाळला पाठवण्यात येत आहे, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.