Latest Marathi News

BREAKING NEWS

कोरोनाची चौथी लाट आली? देशात 24 तासात कोरानासंख्येत वाढ

0 41

 

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या संसर्गाने जोर पकडला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 18 हजार 819 नवीन रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील दिवसाच्या तुलनेत ३० टक्क्यांहून अधिक प्रकरणे वाढली आहेत. बुधवारी, देशात विषाणू संसर्गाची 14,506 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. तर 30 रुग्णांचा मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्या आता एक लाखाच्या पुढे गेली आहे.

Manganga

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 4 हजार 555 इतकी झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 13 हजार 827 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

 

महाराष्ट्रात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी महाराष्ट्रात 3,957 नवीन कोविड-19 रुग्ण आढळले, ज्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 25,735 झाली. याशिवाय, दिवसभरात 7 मृत्यूची नोंद झाली असून एकूण मृतांची संख्या 1,47,922 झाली आहे. काल, बुधवारी दिवसभरात 3696 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्णांची संख्या 77,98,817 झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!