नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 18 हजार 819 नवीन रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील दिवसाच्या तुलनेत ३० टक्क्यांहून अधिक प्रकरणे वाढली आहेत. बुधवारी, देशात विषाणू संसर्गाची 14,506 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. तर 30 रुग्णांचा मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्या आता एक लाखाच्या पुढे गेली आहे.
दरम्यान कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे. बुधवारी (29 जून) कोरोनाचे 14 हजार 506 नवीन रुग्ण आढळले होते. यादरम्यान कोरोनाची लागण झालेल्या 30 जणांचा मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाखांच्या पुढे पोहोचली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी महाराष्ट्रात 3,957 नवीन कोविड-19 रुग्ण आढळले, ज्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 25,735 झाली. याशिवाय, दिवसभरात 7 मृत्यूची नोंद झाली असून एकूण मृतांची संख्या 1,47,922 झाली आहे. काल, बुधवारी दिवसभरात 3696 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्णांची संख्या 77,98,817 झाली आहे.