एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आलं. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. बुधवारी उशीरा रात्री ठाकरेंनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्त केला. त्यानंतर दुसऱ्यादिवशी म्हणजेच आज खासदार संजय राऊत यांनी बंडखोर नेत्यांवर हल्लाबोल चढवला.
माध्यामांशी संवाद साधताना राऊत यांनी, ठाकरेंचा घात केला आता माझ्याकडे बोट का दाखवता? एक दिवस आधी चहा घेतला , तिथ गेल्यावर माझ्यावर टीका केली. मी सेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवला, तुम्ही करुन दाखवणार? असे सवाल बंडखोर आमदारांना उपस्थित केला.

उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्द्वारे जनतेशी संवादादरम्यान हा मोठा निर्णय घेतला. यापार्श्वभूमिवर राऊत यांनी भाष्य केलं. ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यांना कशाप्रकारे राजीनामा द्यावा लागला हे ठाकरेंनी अत्यंत सयमी भाषेत जनतेला सांगितले. आपल्याच लोकांनी दगाबाजी केली त्यामुळे खुर्चीला चिटकून राहण्यात अर्थ नव्हता. ठाकरेंना कधीही सत्तेची लालसा नव्हती. पवारांच्या विनंतीमुळे ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्विकारलं होता. असे राऊत यांनी यावेळी सांगितलं.