मुंबई: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदें गटाचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र या सरकारमध्ये मंत्री कोण होणार याची उत्सुकता आता सर्वांनाचा लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांना मोठी खाती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा होणार आहे. यात मंत्रीपद वाटपाचे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
आज सकाळी १० वाजता भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा होणार आहे. या चर्चेत नव्या मंत्रिमंडळा संदर्भात चर्चा होणार आहे. आज दुपारपर्यंत नव्या मंत्रिमंडळाचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे. यानंतर १२ वाजता शिंदे गटाची बैठक होणार आहे, असी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अशी असेल टीम देवेंद्र
देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री, चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख, गणेश नाईक, धाकृष्ण विखे पाटील, संभाजी पाटील निलंगेकर, मंगलप्रभात लोढा, संजय कुटे, रवींद्र चव्हाण, डॉ. अशोक उईके, सुरेश खाडे, जयकुमार रावल, अतुल सावे, देवयानी फरांदे, रणधीर सावरकर, माधुरी मिसाळ या नेत्यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
या नेत्यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
प्रसाद लाड, जयकुमार गोरे, प्रशांत ठाकूर, मदन येरावार, महेश लांडगे किंवा राहुल कुल, निलय नाईक, गोपीचंद पडळकर, बंटी बांगडिया या नेत्यांना राज्यमंत्री पद मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे गटातील या नेत्यांना मिळणार मंत्रिपद
कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संजय राठोड, शंभूराज देसाई, बच्चू कडू, तानाजी सावंत, राज्यमंत्री दीपक केसरकर, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, भरत गोगावले, या नेत्यांची मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे.