अहमदनगर : दारू विक्री व वाहतूक चालू ठेवण्यासाठी 55 हजारांच्या लाचेची मागणी करुन तडजोड अंती 35 हजारांची रक्कम स्वीकारताना, नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन दुय्यम श्रेणी अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले आहे. मंगळवारी 29 जून रोजी कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे ही कारवाई करण्यात आली आहे. नंदू चींधू परते दुय्यम निरीक्षक आणि राजेन्द्र भास्कर कदम सहा दुय्यम निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव विभाग ,बाभलेश्र्वर असे दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईने लाचखोर अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तक्रारदार यांचा दारू विक्री व्यवसाय असून दारू वाहतूक व विक्री चालु ठेवण्यासाठी दिनाक 27 जुन रोजी आलोसे क्र 1 राजेंद्र भास्कर कदम, वय 46 यानी मागील 11 महिन्याचे बाकी हप्त्याचे 55,000 रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 30,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
तसेच आलोसे क्रमांक 2 नंदु चिंधु परते, (वय 42) यांनी त्यांच्यासाठी दरमहा 5,000 रुपये लाचेची मागणी करून दिनांक 29 जुन रोजी आलोसे राजेंद्र भास्कर कदम याने 35,000 रुपये लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांचेसमक्ष स्विकारतांना पकडण्यात आले.
सदरची कारवाई ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, पोलिस अधीक्षक सुनिल कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक, नारायण न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलिस निरिक्षक संदीप साळुंखे, पो.हवा/ डोंगरे, पो.ना./ इंगळे, पो. ना/नितीन कराड, चापो.ह विनोद पवार यांच्या पथकाने केली असून सदर कारवाई मुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.