मुंबई: भाजपाच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षात सत्तेवर येणारे सरकार पुढील २५ वर्षे चालेल असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदारांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचेहि देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाजपाचे सरकार पुढील २५ वर्ष चालेल असा विश्वास व्यक्त करताना एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांचे विशेष आभार मानले. “अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची एकनाथ शिंदे यांच्या गटाने हिंमत केली. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे,” तसेच, “येत्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांना न्याय द्यायचा आहे,’ असेही फडणवीस म्हणाले.
