मुंबई: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. यावरुन आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले होते, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते. तसेच, बहुमत चाचणी अगोदरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

अशातच आता ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांनो स्वाभिमानी आणि शेकापच्या झोपडीच्या आड्यांचा तुम्ही एक एक बांबू उपसला पण ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त झाला ! देवाच्या काठीला आवाज नसतो !!’ असे ट्विट करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यानो स्वाभिमानी आणि शेकापच्या झोपडीच्या आड्याचा तुम्ही एक एक बांबू उपसला पण ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त झाला !
देवाच्या काठीला आवाज नसतो !!@ANI @MahavikasAghad3
— Raju Shetti (@rajushetti) June 29, 2022