मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे टिकणार की कोसळणार याबाबतच्या चर्चांना मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने आता पुर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत आपण मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याचे सांगितले. परंतु, यावेळी मुख्यमंत्र्यांनी मी पुन्हा येईल असे बोललो नव्हत, असे म्हणत भाजपनेते देवेंद्र फडणवीसांना नाव न घेता टोला लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आम्ही मुंबई आणि हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्यांसमोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊ द्या, मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात उध्दव ठाकरेंच्या हस्ते पूजा हवी आहे. माऊली म्हणतील ते मान्य आहे.

तसेच, महाराष्ट्रात दंगल झाली नाहि मुस्लिमांनी पण ऐकले. मी आलोच अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे, तसेच माझ्यापासून कोणी शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही. तसेच, ‘मी मुख्यमंत्री पदाचा आणि विधान परिषद सदस्याचा पण राजीनामा देत आहे. ‘मी पुन्हा येईल अस बोललो नव्हतो.’ सर्वांचे शासकीस कर्मचारी सहकार्यांचे आभार असे म्हणत त्यांनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला.