Latest Marathi News

आजचे राशीभविष्य, गुरूवार ३० जून २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 588

मेष:-
घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. छंद जोपासायला वेळ मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. गायन कलेचे कौतुक होईल.

 

वृषभ:-
नवीन गोष्टी समर्थपणे पेलाल. घर खर्च वाढू शकतो. कामात स्थैर्य ठेवावे. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवावी. वैचारिक चंचलता जाणवेल.

Manganga

 

मिथुन:-
आपली हौस भागवाल. मनातील निराशा झटकून टाकावी. नियमांचे काटेकोर पालन करावे. गरज पडल्यास थोडे मागे यावे. जोडीदाराला शा‍ब्दिक दिलासा द्यावा लागू शकतो.

 

कर्क:-
स्वभावाला काहीशी मुरड घालावी लागेल. अति विचारात गढून जाऊ नका. झोपेची तक्रार कमी होईल. पोटाची काळजी घ्यावी लागेल. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत.

 

सिंह:-
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. जवळच्या लोकांच्या गाठी पडतील. तुमची कला चार चौघांसमोर सादर करता येईल. भागिदारीतून नफा मिळू शकेल. तरुण लोकांशी मैत्री कराल.

 

कन्या:-
केलेल्या कामातून समाधान मिळेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी. पत्नीशी मतभेदाची शक्यता. चंचलतेला आवर घालावी लागेल. सहकारी वर्ग तुमच्यावर खुश असेल.

 

तूळ:-
बौद्धिक प्रगल्भता वाढीस लागेल. समस्येकडे संधी म्हणून पहावे. जुनी गुंतवणूक फळाला येईल. शेअर्सच्या मार्गाने नफा कमवाल. कामात अपेक्षित यश मिळेल.

 

वृश्चिक:-
व्यावसायिक वातावरण पूरक राहील. सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. अडचणीतून मार्ग काढण्याची तयारी ठेवावी. जोडीदाराकडून समजुतीची अपेक्षा राहील. घरातील कामासाठी वेगळा वेळ काढावा लागेल.

 

धनू:-
सारासार विचार करण्यावर भर द्याल. योग्य तर्क वापरावा लागेल. स्वत:चा मान राखून वागाल. खिलाडु वृत्तीने वागाल. आशावादी दृष्टीकोन वाढीस लावावा.

 

मकर:-
धाडसाला दूर दृष्टीची जोड द्यावी. शांत चित्ताने विचार करावा. तुमची चिकाटी कौतुकास पात्र ठरेल. कौटुंबिक वातावरणातून आनंद मिळेल. घेतलेली जबाबदारी हिंमतीने पार पाडाल.

 

कुंभ:-
व्यावहारिक ज्ञान वापरून कामे पूर्ण कराल. आपल्या ज्ञानाचा योग्य वेळी वापर कराल. टोचून बोलणे टाळण्याचा प्रयत्न करा. अति तिखट पदार्थ खाणे टाळा. स्मरण शक्ति च्या जोरावर बारकावे लक्षात घ्याल.

 

मीन:-
वरिष्ठांपुढे नवीन विचार मांडाल. पित्त विकार बळावू शकतात. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. काही कामे तुमचा कस पाहतील. हट्टीपणा कमी करावा लागेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!