मुंबई: बहुमत चाचणी होण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी राज्यपालांनी २४ तासांत लोकशाहीचे पालन केले, पण १२ विधानपरिषद यादीवर आता निर्णय घ्यावा, असे म्हणत त्यांनी ठाकरे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला.
फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,’सरकार म्हणून बळीराजाला कर्जमुक्त केले. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण उस्मानाबादचे धाराशिव करून आयुष्य सार्थकी लागले. शरद पवार आणि सोनिया गांधी या सहकाऱ्यांचे धन्यवाद. कॅबिनेटच्या मंत्रिमंडळात चारच शिवसेनेची मंत्री आज होते कुणीही विरोध केला नाही. ज्यांनी करायचे होते ते नामानिराळे ज्यांनी विरोध भासवला त्यांनी समर्थन दिले’.

‘अनेकांना शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठे केले ज्यांना मोठे केले तेच विसरले. जे देणे शक्य होते ते सगळं दिलं. मातोश्रीला अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिल ते नाराज ज्यांना काहीच मिळाले नाही ते सोबत हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरु आहे,असेही उद्धव ठाकरे म्हणाले.