Latest Marathi News

BREAKING NEWS

ब्रेकिंग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला राजीनामा!

0 474

मुंबई : आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

 

दरम्यान, एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडी सरकारचा जोरदार सत्तासंघर्ष सुरु असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले होते. परंतु, सुप्रीम कोर्टाने उद्याच बहुमत चाचणी होणार असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेकडून बहुमत चाचणीबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. महाविकास आघाडी सरकारला उद्या ३० जूनलाच बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीची स्थगिती रोखली. परंतु, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!