मुंबई: आताची सगळ्यात महत्वाची बातमी समोर येत आहे. कोर्टातील तीन तासांच्या युक्तिवादानंतर उद्या बहुमत चाचणी होणार आहे. उद्या ११ ते ५ या कालावधीदरम्यान हि बहुमत चाचणी होणार आहे. यामध्ये कोणताही स्टे होणार नाही. त्यामुळे आता या बहुमत चाचणीला ठाकरे सरकारला सामोरे जावे लागणार आहे.
तसेच या बहुमत चाचणीसाठी राष्ट्रवादी नेते देशमुख व मलिक यांना कोर्टाने हजार राहण्याची परवानगी दिली असून सध्या महाविकास आघाडीकडे संख्याबळ कमी असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जातील कि नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.