मुंबई: महाविकास आघाडी सरकारने आज, मंगळवारी मोठे निर्णय घेतले आहेत. औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. सोबतच उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. आज २९ जून २०२२ ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार आपल्या शेवटच्या घटका मोजत आहे. उद्या, ३० जुलैला मविआ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. अशात राज्य सरकारकडून सरकार कोसळण्यापुर्वी निर्णयांचा सपाटा लावण्यात आला आहे. औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. सोबतच उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता देण्यात आली आहे.
