मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या बहुमत चाचणी आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. तसेच, मुख्यमंत्री बहुमत चाचणीला सामोरे जाणार नसल्याचीही माहिती समोर येत आहे.
आता जर कोर्टाने उद्या बहुमत चाचणी घेण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निर्णय कायम ठेवला तर मग मुख्यमंत्री फक्त निरोपाचे भाषण करणार असल्याची माहिती माहिती समोर येत आहे. उद्या महाविकास आघाडी सरकारची अग्निपरिक्षा होती, परंतु आता ते या बहुमत चाचणी आधीच माघार घेणार की काय? अशा चर्चांना उधान आले आहे. पण हा सर्व निर्णय आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे.

दरम्यान, उद्या मुंबई आयुक्त संजय पांडे यांचाही कार्यकाळ संपत आहे. जर उद्या महाविकास आघाडी सरकार बहुमत सिद्ध करू शकले नाही. तर नव्या मुख्यमंत्र्यांसोबत नवे पोलिस आयुक्तही येतील.