मुंबई : तुम्ही जे सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद, जी कायदेशीर प्रक्रिया असेल त्याला सामोरे जाऊ, मला माझ्याच लोकांनी धोका दिला म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रीमंडळाच्या बैठकीदरम्यान आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना केले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यसरकारला उद्या बहुमत चाचणी घेण्याबाबतचे आदेश दिले आहेत. या चाचणी विरोधात शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. त्यामुळे जर कोर्ट निर्णयामध्ये जर राज्य सरकारला उद्याचे आपले बहुमत सिद्ध करावे लागले तर काय होणार, सरकार टिकणार की कोसळणार? याबाबत सध्या सर्वांच्या मनात शंका उपस्थित होत आहेत.

अशातच आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच आपल्या सहकाऱ्यांशी बोलतना मला सहकार्य दिल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी धन्यावादाची भाषा का केली याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.