अंबरनाथ : एकनाथ शिंदे गटात सामील असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बंडखोर आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच किणीकर यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि , एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर हे देखील त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेले आहेत. अंबरनाथमध्ये आमदार किणीकर यांना आज एका अज्ञात इसमाने पत्राद्वारे धमकी पत्र पाठवले आहे. याबाबत किणीकर यांचे ऑफिस क्लार्क प्रकाश भोगे यांनी अंबरनाथ मधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात या धमकी निनावी पत्राबाबत महिती देऊन तक्रार अर्ज सादर केला. या पत्रात सदर इसमाने त्यांना गोळी मारून ठार असल्याची धमकी दिली आहे.

दरम्यान, आमदार बालाजी तेरेको गोली मारनेका दिन आ गया हे, हामारे अंबरनाथ के शिवसेना नेता को तकलीफ देता है इसिलिए तुझे मारनेका हे, बता इसलिये रहा हु जब में मारूंगा वह दिन तय हे तब तक टू रोज डर डर के जिये, असे धमकी देणाऱ्या पत्रात लिहिले आहे.