भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये बर्मिंगहॅम येथे १ जुलैपासून एकमेव कसोटी सामना खेळल्या जाणार आहे. कसोटी सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आला होता. कसोटीत त्याच्या खेळण्याबाबत तसेच भारताचे कर्णधार कोण असेल, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात होते. इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीला रोहित शर्मा मुकणार असून जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संघाच्या बैठकीत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. एक विजय किंवा बरोबरी देखील त्यांना मालिका जिंकण्यास मदत करेल, पण जागतिक कसोटी चॅम्पियनशिप साठी नक्कीच महत्त्वपूर्ण आहे. लीसेस्टरशायर विरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान रोहित शर्माची कोविड -19 चाचणी पॉसिटीव्ह आली होती, ज्यामुळे तो सामन्याच्या दुसऱ्या डावाला मुकला होता. भारतीय संघ व्यवस्थापनाला आशा आहे की तो कसोटीसाठी वेळेत तंदुरुस्त होईल, परंतु जर तो सावरला नाही तर भारतासाठी ही कठीण परिस्थिती असेल.
