नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. पुढच्या महिन्यांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून महागाई भत्ता वाढवण्यावर अधिकृत भाष्य करण्यात आलं नाही. मात्र, काही वृत्ताच्या माहितीनुसार सरकारडून महागाई भत्ता वाढवण्यावर काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खरं तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे . केंद्र सरकारकडून जुलै महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या केंद्र सरकारकडून ३४% दरानुसार महागाई भत्ता देण्यात येत आहे. यावर्षी मार्चमध्ये महागाई भत्ता वाढवला होता.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जातो. केंद्र सरकार दरवर्षी महागाई भत्त्यांमध्ये वाढ करते. तसेच केंद्र सरकार पुढे कोणत्याही प्रकारचे नवे वेतन आयोग आणणार नाही. त्यामुळे सरकारकडून कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्यासाठी हा नवीन फॉर्म्युला आमलात आणला जाऊ शकतो.
रिपोर्टनुसार, केंद्र सरकार कामगिरीच्या आधारावर वेतन वाढवण्यासाठी सदर फॉर्म्युला वापरात आणू शकते. त्याप्रमाणे सरकारची तयारी सुरू आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची वेतनात वाढ करण्यात येऊ शकते. या प्रक्रियेला ‘ऑटोमेटिक पे सिस्टम’ नाव देण्यात येऊ शकते. ६८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ५२ पेन्शनधाराकांना ५० %महागाई भत्त्यामध्ये वाढ ही ‘ऑटोमेटिक पे सिस्टम’ प्रक्रियेनुसार होऊ शकते.
दरम्यान, केंद्रीय सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी केली तर त्याचा फायदा निम्न स्तरावरील कर्मचाऱ्यांना मिळू शकतो. लेव्हल मैट्रिक्स १ ते ५ मध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी कमीत कमी २१ हजार होऊ शकते. केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांना बरोबरीचा फायदा मिळावा हा उद्देश आहे.