पुणे : राज्यातील तमाम शिवसैनिक ठाकरे सरकारला पाठिंबा देत आहेत. तर काही संघटना आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटाचे समर्थन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नाना जावळे यांनी पत्रकार परिषदेत वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे यांना छावा संघटनेचे लाखो सदस्य मुंबईत संरक्षण देणार आहेत. संजय राऊत यांनी आपली टवाळकी बाहेर जाऊन करावी.राज्यात ठाकरेशाही चालणार नाही. संभाजी राजेंना पाडण्याचे काम शिवसेनेने आणि संजय राऊतांनी केले. संजय राऊत यांनी स्वत:ला आवरावे नाहीतर मारहाण करु, असा इशारा जावळे यांनी राऊत यांना दिला आहे.
यावेळी जावळे म्हणाले कि, शेतकरी मरत आहेत आणि ते राजकीय पोळी भाजत आहेत. मराठा समाजाविषयी राऊत अभद्र शब्द वापरतात. मुक मोर्चाला मुका म्हणतात अणि हे आम्हाला शिकवतात. तुमच्या हातात दंडुके तर आमच्या हातात तलवार आहे. ही तर राजकीय क्रांती आहे. आमचा पक्षाला विरोध नाही पण होणाऱ्या क्रांतीला आमचा पाठिंबा आहे. मुंबई तुमच्या बापची नाही, हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे.

तसेच, संजय राऊत यांनी आपली टवाळकी बाहेर जाऊन करावी. राज्यात ठाकरेशाही चालणार नाही. आम्ही सत्तेसाठी कधीही लाचारी स्वीकारली नाही. आमच्यावर आरोप करणारे सगळे दलाल आहेत. संभाजी राजेंना पडण्याचे काम सेनेने आणि संजय राऊतने केले, अशी टीका जावळे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर केली आहे.