पुणे : पुण्यातील भोर येथे एका सावत्र मुलाने आपल्या आईची हत्या केली आहे. मुलाने झोपेत असलेल्या सावत्र आईच्या डोक्यात दगडी पाट्याने वार केल्याने आईचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी मुलगा फरार झाला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, रेश्मा अंकुश शिंदे (वय 36) असे मयत महिलेचे नाव आहे. तर शिवम अंकुश शिंदे असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. मंगळवारी रात्री रेशमा ह्या घरात झोपल्या होत्या. त्यावेळी त्यांचा सावत्र मुलगा शुभम याने घरातील दगडी पाट्याने रेश्मा यांच्या डोक्यात वार केल्याने रेश्मा यांचा जागीच मृत्यू झाला. या सर्व प्रकारानंतर शिवम हा घरातून पसार झाला.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिवम विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. तसेच, शिवमने आपल्या आईचा खून का केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.