मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राज्य सरकारची बहुमत चाचणी घेण्याबाबतची मागणी केली होती. त्यानुसार आता विधानसभेचे अधिवेशन उद्या गुरुवारी बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनामध्ये बहुमत चाचणीसाठी मनसेने आपला पाठिंबा भाजपला दिल्याची माहिती समोर येत आहे.
अशातच मागील राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपलाच पाठींबा करणारे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचे मत उद्या देखील भाजपला मिळणार आहे. कारण मनसेच्या पाठिंब्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला होता. तसेच, राज ठाकरे यांनी देखील आपण भाजपलाच पाठींबा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील भाजपच्या बाजूने असणार आहेत.

दरम्यान, उद्या होणाऱ्या अधिवेशनासाठी सज्ज रहा अशी सूचना भाजपा कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठींनी दिली आहे. त्यामुळे उद्याची बहुमत चाचणी राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने निर्णायक अशी ठरणार आहे.