Latest Marathi News

BREAKING NEWS

 

100 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी घेतली आईंची भेट!

0 340

गुजरात: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचा आज 100 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी आईची सदिच्छा भेट घेण्यासाठी गुजरातमध्ये त्यांच्या भावाच्या घरी पोहोचले. आईच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली. यापूर्वी 11 मार्च रोजी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असताना अहमदाबादमध्ये त्यांनी आईची भेट घेतली होती. आईच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात पुजा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.

 

पंतप्रधान मोदी यांनी 100व्या वाढदिवसानिमित्त आई हिराबा यांचे पाय धुतले आणि त्यांनी पुष्पहार घालून त्यांच्या चरणांना स्पर्श करत आईचा आशिर्वाद घेतला.

 

तसेच, यावेळी पंतप्रधान मोदी 21 हजार कोटी रुपयांच्या योजनाचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आज सकाळी 9.15 वाजता पावागड टेकडीवरील श्री कालिका मातेच्या पुनर्विकसित मंदिराचे उद्घाटन करतील. त्यानंतर रात्री 11.30 वाजता मोदी हेरिटेज फॉरेस्टलाही भेट देतील.

 

 

पंतप्रधान आज दुपारी 12:30 वाजता वडोदरा येथे गुजरात गौरव अभियानात सहभागी होतील. यावेळी पंतप्रधान 21,000 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करुन गुजरातला मोठी भेट देणार आहेत.

 

 

तसेच, आज गुजरात गौरव अभियानादरम्यान पंतप्रधान 16 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यावेळी फ्रेट कॉरिडॉरचा 357 किमी लांबीचा न्यू पालनपूर-मदार विभागाचे लोकार्पण करण्यात येईल.

 

तसेच, 81 किमी लांबीच्या पालनपूर-मिठा विभागाचे विद्युतीकरण, सोमनाथ, सुरत, उधना आणि साबरमती स्थानकांच्या पुनर्विकासाची आणि 166 किमी अहमदाबाद-बोताड विभागाच्या गेज हस्तांतरणाची पायाभरणीही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.