नवी दिल्ली : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. आजही कच्चा तेलाच्या किमतीत अचानक घसरण झाली आहे. शनिवारी सकाळी कच्चा तेलाच्या दरात मोठी घट झाली. कच्चा तेलाचे दर 5 डॉलर्सनी घसरून प्रति बॅरल 113 डॉलरवर आले. कच्चा तेलाच्या किमतीत घसरण होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले.
तसेच, आज पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर जारी केले. त्यानुसार आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलीही वाढ झालेली नाही. पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. वास्तविक, अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर 0.75 टक्क्यांनी वाढवल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम झाला आहे. सुमारे अडीच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
दरम्यान, शनिवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.27 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे.