Latest Marathi News

BREAKING NEWS

 

५ वर्ष प्रेमसंबधानंतर प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने तरुणीने…!

0 439

बदलापूर : ५ वर्षाच्या प्रेमसंबधानंतर प्रियकराने ऐनवेळी लग्नाला नकार दिल्याने एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. सोमवारी पहाटे बदलापूरजवळ रेल्वे रुळावर तरुणीचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी कासगाव येथे राहणाऱ्या प्रियकराला अटक केली आहे.

 

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, कल्याणला राहणाऱ्या २४ वर्षीय मृत तरुणीची बदलापूरच्या कासगावमध्ये राहणाऱ्या करण लहाने या तरुणाशी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. यानंतर गेल्या ५ वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. परंतु, मृत तरुणीने त्याच्याकडे लग्नाची मागणी केल्यानंतर त्याने टाळाटाळ करत लग्नाला नकार दिला. यानंतर मृत तरुणीच्या कुटुंबीयांनीही करणच्या घरी जाऊन विनवणी केली.

 

पण, त्यांनाही करणच्या कुटुंबीयांनी हाकलून दिल्याचा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केला. या सगळ्यानंतर या तरुणीने करण यांच्याविरोधात बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली, मात्र त्याची पोलिसांनी दखल घेतली नाही. या तक्रारीची करणला माहिती मिळताच करणच्या मित्रांनी या तरुणीला फोन करत करण आत्महत्या करत असून तू लवकर ये, असे सांगितले. त्यामुळे रविवारी दुपारी ही तरुणी करणला भेटण्यासाठी म्हणून बदलापूरला गेली, मात्र सोमवारी पहाटे बदलापूरजवळ रेल्वे रुळावर तिचा मृतदेह आढळून आला.

 

दरम्यान, करणने या तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार तरुणीच्या कुटुंबीयांनी केली. त्यानुसार पोलिसांनी करण लहाने याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.