मावळ : वडगाव मावळ येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास धारधार शस्त्राने वार करून एका युवकाचा खून करण्यात आला होता. या खूनाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या 6 साथीदारांना अटक केली. किरकोळ कारणातून हा खून केल्याची कबूली आरोपींनी दिली.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, विश्वजीत देशमुख असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. तर राम विजय जाधव, आदित्य ऊर्फ सोन्या सुरेंदर चौहान अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. किरकोळ कारणावरून आरोपी व मयत विश्वजीत यांच्यात भांडणे झालेली होती. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी आणि त्याच्या 6 साथीदारांनी सोमवारी वड़गाव गाठत विश्वजीतवर तलवार तसेच कोयत्याने वार केले. यामध्ये विश्वजीत देशमुख याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या विश्वजीतचा मित्र सागर इंद्रा याला सुद्धा आरोपींनी गंभीर जखमी केले. या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. परंतु, गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आरोपीना अटक केली.