भंडारा : भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात 8 नवीन कोरोना रुग्ण बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात हळूहळू कोरोना वाढू लागला असून, पुन्हा 8 रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात आता संक्रमित रुग्णांची संख्या 31 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
दरम्यान, सध्या जिल्ह्यात कोरोनाचे 31 सक्रिय रुग्ण असून यामधील 15 रुग्ण भंडारा तालुक्यातील आहे. तर पवनीत 8 रुग्ण, तुमसरात 5 रुग्ण तसेच मोहाडी, लाखनी आणि लाखांदूरमध्ये प्रत्येक 1 रुग्णाचा समावेश आहे. दिवसागणिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून, नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आलं आहे.