आटपाडी: दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचे महत्त्व नेमके काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
18 जून : झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी.
राणी लक्ष्मीबाई यांचे संपूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या; हिंदुस्थानात इ.स. 1857 च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.
1981 : जनावरांमधे आढळणार्या लाळ्या-खुरकुत रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.
1946 : डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले. या घटनेच्या स्मरणार्थ पणजींतील एका रस्त्याला ’18 जून रस्ता’ असे नाव देण्यात आले आहे.
1901 : रामचंद्र भिकाजी गुंजीकर – ’मोचनगड’ या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि ’विविध ज्ञानविस्तार’ मासिकाचे संपादक.
1987 : साली एम. एस. स्वामिनाथन यांना प्रथम जागतिक अन्न पुरस्कार (वल्ड फूड) मिळाला.
1858 : मणिकर्णिका तांबे ऊर्फ ’राणी लक्ष्मीबाई’ – झाशीची राणी – इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या.
1983 : साली अमेरिकन अंतराळवीर आणि भौतिकशास्त्रज्ञ सॅली क्रिस्टन राइड (Sally Kristen Ride) या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला ठरल्या.
1899 : साली भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि भारतातील समाज सुधारणावादी चळवळीचे नेते तसचं, महात्मा गांधी यांचे अनुयायी दादा धर्माधिकारी यांचा जन्मदिन.
1576 : साली मुघल शासक अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यात हळदी घाटीच्या युद्धाला सुरुवात झाली.
2009 : उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्मविभूषण (1969), मॅकआर्थर फेलोशिप, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, नॅशनल हेरिटेज फेलोशिप.