नवी दिल्ली – राजस्थानच्या झुंझुनू येथील सिंघाना पोलीस स्टेशन हद्दीतील ढाणा गावातील एका महिलेने आपल्या पतीला सोडून तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या मुलाशी लग्न केल्याची घटना घडली आहे. पीडित पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध सिंघानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सिंघाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ढाणा गावात राहणाऱ्या हेमराजचे 17 जुलै 2013 रोजी एका महिलेशी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पाच महिन्यांपूर्वी पत्नी प्रियकर संदीपसह फरार झाली होती. या दोघांचे जवळपास 10 महिने प्रेमप्रकरण सुरू होते. त्यांचे प्रेमप्रकरण हरिद्वार येथून सुरू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.असे पोलिसांनी सांगितले.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, 21 सप्टेंबर 2021 रोजी हेमराजच्या ताईचे निधन झाले. 26 सप्टेंबर रोजी ताईंच्या अस्थीकलशाच्या विसर्जनासाठी कुटुंबीय हरिद्वारला गेले होते. यावेळी हेमराजची पत्नी त्याच्यासोबत होती. हरिद्वारमध्ये ताईंच्या अस्थीकलशाच्या विसर्जनाच्या कार्यक्रमादरम्यान हेमराजच्या पत्नीची सीकर जिल्ह्यातील गावात राहणाऱ्या संदीपशी भेट झाली.
हरिद्वारमध्ये दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. यानंतर गावात आल्यावर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. पुढे या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 4 जानेवारी 2022 रोजी पत्नी तिचा प्रियकर संदीपसोबत तिच्या दोन्ही मुलांना घरी सोडून पळून गेली. यानंतर पती हेमराजने 6 जानेवारी रोजी सिंघाना पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. सिंघाना पोलिसांनी तक्रार नोंदवल्यानंतर पीडित हेमराजच्या पत्नीचा शोध सुरू केला आणि 13 रोजी ती सापडली.
दरम्यान, शोध घेतल्यानंतर तिला सिंघाना पोलीस ठाण्यात आणण्यात आले, पत्नीने पोलीस ठाण्यात प्रियकर संदीपसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे तिला तिच्या प्रियकरासह पाठवण्यात आले.