Latest Marathi News

BREAKING NEWS

 

बीड: दुचाकींच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; अपघातस्थळी रक्तामांसाचा सडा!

0 237

बीड: बीड-परळी महामार्गावरील जरुडफाटा येथे दोन भरधाव दुचाकींची समोरून धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी घडली. सुभाष लक्ष्मण राठोड ( वय ४५ रा. वडवणी) आणि नरेंद्र प्रभाकर जोशी (वय ५१, रा.रायगड कॉलनी, बीड), अशी मयात व्यक्तींची नावे आहेत.

 

 

प्राप्त माहितीनुसार, बीड तालुक्यातील जरूड फाटा येथे मंगळवारी बीड-परळी महामार्गावर दुचाकी क्र. (एम.एच.23 ए.एम.8537 ) आणि दुसरी दुचाकी क्र. (एम.एच.44.वाय 3527 ) या दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात सुभाष लक्ष्मण राठोड आणि नरेंद्र प्रभाकर जोशी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत नरेंद्र जोशी हे वडवणी येथील वीज कंपनीच्या कार्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत होते. अपघात एवढा भीषण होता की दोघांना गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. दोन्ही दुचाकीच्या समोरील भाग चक्काचुर झाला तर रस्त्यावर रक्तामांसाचा सडा पडला होता.]

 

दरम्यान, सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.