Latest Marathi News

BREAKING NEWS

 

”ज्यांनी बिरोबाची शपथ नाही पाळली , त्यांना हिंदू धर्म काय कळला?” ‘यांची’ पडळकरांवर सडकून टीका!

0 815

अहमदनगर : ‘ज्यांनी बिरोबाची शपथ घेऊन पाळली नाही, त्यांना हिंदू धर्म काय कळला? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर जोरदार टीका केली आहे. आज सकाळपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे जाण्यापासून गोपिचंद पडळकर यांना पोलिसांनी रोखले होते.

 

 

चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार हे आले होते. त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी पडळकर यांना रोखले होते.

 

रोहित पवार म्हणाले, ‘पडळकर खूप चांगली अँटिंग करतात, व्यक्तिगत स्टंट पडळकरांनी केला, त्यांची चिडचिड होणार कारण खूप मोठया प्रमाणात गर्दी केली. पडळकरांचे भाषण हे थर्ड ग्रेडचे भाषण होते. शिवाय मातीत घालायचं की नाही ते लोक ठरवतील. रोहित पवार लहानपणापासून किती वेळा इथे आला ते बघा. मागच्या वेळी राम शिंदे यांची सभा उधळून लावली. कारण तुम्हाला टीव्ही वर दिसायच होत. तसेच पडळकरांची मागच्या ४ दिवसांची भाषण ऐकली तर दगडफेक करा अशा स्वरूपाची होती त्यामुळे पोलीस कारवाई करणारच की’ असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले आहे. तसेच या ठिकाणी ९० टक्के धनगर लोक होती, मग ते पैसे घेऊन आले अस म्हणायचे आहे का? असे म्हणताना लाज वाटायला पाहिजे. इथली वस्तू ही भाजपच्या काळात झाली नाही, इथल्या भिंती पडायला लागल्या राम शिंदे यांना म्हणावं समोर येऊन बोला असा इशाराही रोहित पवारांनी यावेळी शिंदेना दिला.

 

दरम्यान, इथे सगळ्यात चांगली वस्तू म्हणजे राम शिंदे यांचा बंगला आहे असा टोलाही रोहित पवार यांनी यावेळी लगावला. तसेच ज्यांनी बिरोबाची शपथ घेऊन पाळली नाही त्यांना हिंदू धर्म काय कळला असा हल्लाबोल देखील रोहित पवारांनी पडळकरांवर केला. दरम्यान या सर्व प्रकरणानंतर तब्बल दोन तासांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना चौंडीत प्रवेश दिला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.