मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. एमपीएससी २०२० ची मुख्य परीक्षा ४, ५ व ६ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर आज मंगळवारी परीक्षा २०२० चा अंतिम निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रमोद चौगुले हा राज्यात सर्वसाधारण उमेदवारांमधून प्रथम आला आहे.
या परीक्षेमध्ये प्रमोद बाळासो चौगुले (बैठक क्रमांक PN005337) हा राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून प्रथम आला आहे. तसेच, रूपाली गणपत माने बैठक क्रमांक (PN002157) या विद्यार्थीनीने महिलांमधून बाजी मारली आहे. तसेच गिरीश विजयकुमार परेकर (बैठक क्रमांक PN002362) हा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आला आहे. या परीक्षेच्या माध्यमातून एकूण दोनशे पदावर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे.