Latest Marathi News

BREAKING NEWS

 

‘या’ कारणामुळे, महिलेने भाड्याचे गुंड बोलवून महिलेवरच करायला लावला बलात्कार!

0 469

हैद्राबाद: हैदराबादमधील कोंडापूर येथील श्रीरामनगर कॉलनीत पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशय असल्याने महिलेने पाच गुंडांना महिलेवर सामूहिक बलात्कार करायला लावल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार महिलेने आरोपींना मोबाइलमध्ये रेकॉर्डदेखील करायला सांगितला होता अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.

 

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, मुख्य आरोपी गायत्रीने पतीचे विवाहबाह्य संबंध असणाऱ्या महिलेला धडा शिकवण्यासाठी हा कट आखला होता. सायबर पोलिसांनी सांगितले की, युपीएससी परीक्षेची तयारी करत असताना गायत्रीचा पती श्रीकांत आणि पीडितेची ओळख आली. पीडित महिला अनेकदा त्यांच्या घरी येत असे. ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या काळात ती त्यांच्याकडे वास्तव्याला होती.

 

परंतु, आपला पती आणि पीडितेमध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय गायत्रीला आला तसेच, गायत्रीसोबत सतत भांडण होत असल्याने पीडितेने अखेर ते घर सोडले.

 

दरम्यान, पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, २६ मे रोजी गायत्रीने आपल्याला घऱी बोलावले. तिथे पोहोचल्याने भाड्याने बोलावलेल्या पाच गुडांनी आपल्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपींनी सगळा प्रकार रेकॉर्ड केला आणि पोलिसांकडे गेल्यास परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी गायत्रीसोबत सहा जणांना अटक केली आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.