Latest Marathi News

BREAKING NEWS

 

दगडू-प्राजूच्या प्रेमाचा ‘Timepass 3’ चा टीझर प्रदर्शित; हृता दुर्गुळे चा कधी न पाहिलेला पहा अंदाज!

0 292

मुंबई: रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास 3’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाला टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘टाईमपास’च्या सीरिजमधील या तिसऱ्या भागात अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री हृताचा कधीही न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे आणि त्याचीच झलक या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. ‘आई बाबा आणि साईबाबा शप्पथ, आणतोय तीच मजा, तोच टाईमपास एका वेगळ्या अंदाजात. पाहा दगडू आणि पालवीच्या गोष्टीची झलक,’ असे कॅप्शन देऊन हृताने सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.

 

 

या टीझरची सुरुवात ‘लहानपणी टाईमपास म्हणून झालेल्या लव्हपासून लग्नाच्या लोच्यापर्यंतची स्टोरी सगळ्यांनी पाहिली. पण त्या प्रवासात अजून एक गोष्ट होती जी…,’ अशी होते. सुरुवातीला चित्रपटाच्या पहिल्या भागातील दगडू आणि प्राजक्ताची झलक आणि मला वेड लागले हे गाणं दाखवल्यानंतर पालवीची धमाकेदार एंट्री होते. तिचे काही ऍक्शन दृश्ये दाखवले जातात आणि यावेळी ती म्हणते “आपन पालवी दिनकर पाटील, अशी पालवी जी फुटत नाय, फोडते, “आपल्या दोस्ताला जो नडेल, त्याचा आपन मार्बल फोडेल” अश्या डायलॉगने ऋताचा डॅशिंग अवतार दिसून येतो. तर दगडूचा डायलॉग “मनाचा डोअर ओपन ठेवला की ज्ञानाचा लाईट कधी कुठून कसा येईल काही सांगता येत नाही”, असा दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात एकापेक्षा एक भन्नाट डायलॉग या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे चित्रपटात आणखी काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे.

View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

तसेच प्रथमेश परबचा दगडू आणि वैभव मांगले हे सुद्धा या टिझरमध्ये दिसत आहेत. आता ही नेमकी गोष्ट आपल्याला काय दाखवणार आहे? पालवी नेमकी कोण आहे? चित्रपटात या चित्रपट प्राजू आहे की नाही? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. या सर्वांची उत्तरे 29 जुलैला आपल्याला मिळणार आहेत.

 

दरम्यान, ‘टाईमपास’ हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरने यामध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर 2015 मधील ‘टाईमपास 2’मध्ये प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापटने मुख्य भूमिका साकारली होती. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन रवी जाधवने केले होते. आता ‘टाईमपास 3’मध्ये हृता आणि प्रथमेशची नवी जोडी पहायला मिळत आहे. ऋताच्या या नवीन अंदाजामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. अभिनेत्री ऋता दुर्गुळेने फुलपाखरू मालिकेत काम केले होते. त्यावेळी तिला क्रश हा टॅग देण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.