Latest Marathi News

BREAKING NEWS

 

लॅपटॉपची ‘अशा’ पद्धतीने करावी स्वच्छता; जाणून घ्या अधिक माहिती!

0 150

मुंबई लॅपटॉप हे आजच्या काळात प्रत्येकासाठी आवश्यक गॅझेट बनले आहे. परंतु, इतर गॅजेट्सपेक्षा अधिक काळजी लॅपटॉपची घेणे आवश्यक आहे.

 

 

 

लॅपटॉपची वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे आहे. काम करताना किंवा काम करता करता खाल्ल्यामुळे लॅपटॉवर घाण साचली जाते. त्यामुळे तो लवकरच घाण होतो त्यासाठी लॅपटॉप स्वच्छ करणे अधिक महत्वाचे आहे. साफसफाई करताना काही चूक झाली तर लॅपटॉप खराब होण्याची शक्यता असते. लॅपटॉपची साफसफाई करताना आपण कोणत्या चुका टाळायला पाहिजेत.

 

यासाठी लॅपटॉपच्या कीबोर्डवरील धूळ काढून टाकण्यासाठी आपण कॉम्प्रेस्ड एअरचा वापर करतो परंतु, यामुळे लॅपटॉप खराब होण्याची अधिक शक्यता असते. असे केल्याने आपल्या लॅपटॉपचे काही संवेदनशील भाग खराब होऊ शकतात. तसेच, लॅपटॉपच्या फॅनच्या ब्लेडला हानी पोहोचवू शकतो.

 

तसेच, लॅपटॉपची स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी आपण बऱ्याचदा किचन टॉवेलचा वापर करतो. खरेतर, किचन टॉवेल आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनसाठी कठीण असू शकते त्यामुळे स्क्रीनवर ओरखडे येऊ शकतात. यामुळे आपल्या लॅपटॉपची स्क्रीन खराब होऊ शकते. लॅपटॉप स्क्रीन साफ करण्यासाठी आपण मायक्रोफायबर टॉवेलचा वापर करावा.

 

त्याचप्रमाणे, लॅपटॉपचा कीबोर्ड साफ करणे खूप त्रासदायक काम आहे कारण कीबोर्डच्या कीमध्ये घाण साचते. अशावेळी घाण साफ करण्यासाठी आपण टूथब्रश किंवा इतर कोणत्याही ब्रशने साफ करतो पण, असे केल्याने कीबोर्ड खराब होण्याचा शक्यता वाढते व स्वच्छताही नीट होत नाही. कीबोर्ड साफ करण्यासाठी मेकअप ब्रश किंवा पेंट ब्रशचा वापर करावा.

 

याशिवाय, लॅपटॉप क्लीनिंगसाठी बाजारात अनेक प्रकारची स्क्रीन क्लीनिंग उत्पादने उपलब्ध आहेत परंतु, आपण कमी पैसे खर्च करण्याच्या नादात आपण घरातील काही क्लीनिंग पदार्थांचा वापर करतो त्यामुळे लॅपटॉपची स्क्रीन खराब होते त्यासाठी घरगुती रसायनाचा वापर टाळावा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.