Latest Marathi News

BREAKING NEWS

 

‘हे’ केल्यावर WhatsApp वर मिळणार पैसे! जाणून घ्या कसे मिळवायचे पैसे!

0 271

नवी दिल्ली: WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन मिळतो. परंतु तुम्हाला WhatsApp वर मेसेज करण्यासोबतच पैसेही मिळाले तर? या प्लॅटफॉर्मवर युसर्सला कॅशबॅक मिळत आहे.

 

 

वास्तविक, वापरकर्त्यांना WhatsApp पेमेंट केल्यावर कॅशबॅक मिळत आहे. अॅप एका ट्रँजॅक्शनवर 35 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. परंतु ही ऑफर सर्व वापरकर्त्यांसाठी नाही, यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील.

 

WhatsApp पेमेंट्स वापरून पहिल ट्रँजॅक्शन केल्यावर तुम्हाला कॅशबॅक मिळेल. युजर्स या ऑफरचा तीन वेळा लाभ घेऊ शकतात, यासाठी त्यांना वेगवेगळ्या वापरकर्त्यांना तीन वेळा पैसे ट्रान्सफर करावे लागतील. WhatsApp कॅशबॅक मिळवण्यासाठी वापरकर्त्यांना काही महत्त्वाच्या अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.

 

व्हॉट्सअॅपची कॅशबॅक ऑफर वेगवेगळ्या युजर्ससाठी वेगवेगळ्या वेळी उपलब्ध असणार आहे. जेव्हा तुम्हाला कॅशबॅक ऑफर मिळेल तेव्हाच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकाल. लवकरच तुम्हाला WhatsApp कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. तुम्ही इतर कोणत्याही WhatsApp वापरकर्त्याला पैसे ट्रान्सफर करून 35 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता.

 

तसेच, यासाठी किमान रकमेच्या व्यवहाराची मर्यादा नाही. म्हणजेच, तुम्ही कितीही रक्कम ट्रान्सफर करून कॅशबॅकचा लाभ घेऊ शकता. आणि महत्वाचे म्हणजे युजर्सला फक्त तीन वेळा कॅशबॅक मिळेल. तसेच, एका युजरला पेमेंट केल्यावर तुम्हाला फक्त एकदाच कॅशबॅक मिळेल. म्हणजेच, जास्तीत जास्त तीन वेळा कॅशबॅक मिळविण्यासाठी, तुम्हाला तीन युजर्सला पैसे पाठवावे लागतील.

 

तुम्हाला कॅशबॅकसाठी काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. यासाठी वापरकर्त्याचे खाते किमान 30 दिवस जुने असणे आवश्यक आहे. पेमेंटसाठी, वापरकर्त्यांना त्यांचे बँक डिटेल्स WhatsApp शी लिंक करावे लागतील.

 

तुम्ही ज्या व्यक्तीला पेमेंट कराल तोही व्हॉट्सअॅपवर असावा. याशिवाय, इतर युजर्सनीही व्हॉट्सअॅप पेमेंटवर नोंदणी करावी. म्हणजेच, पाठवणार आणि स्वीकारणारा दोघांचेही WhatsApp पेमेंट खाते सेटअप असले पाहिजे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.