Latest Marathi News

BREAKING NEWS

 

व्हिडिओ! रस्त्यावर उलटला दारूचा ट्रक, लहान मुले सुद्धा पळाले बाटल्या घेऊन!

0 359

माणूस हा दारूसाठी समोर आलेली कोणतीच संधी सोडत नाहीत. याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर दारूच्या बाटल्याच बाटल्या दिसून येत असून दारू लुटण्यासाठी लहान मुलांची पळापळ सुरू असलेली दिसून येत आहे.

 

 

या व्हायरल व्हिडीओमध्ये, रस्त्यावरून दारूच्या बाटल्या घेऊन जाणारा एक ट्रक पलटी झाला. रस्त्यावर दारुच्या बाटल्यांचा ढिग पडल्याची बातमी आजुबाजूच्या परिसरात समजली आणि फुटकची दारु पळवण्यासाठी लोकांनी इकडे गर्दी केली. लोकांनी दारुच्या बाटल्या पळवण्यासाठी तोबा गर्दी केली. तसेच लहान लहान मुलेही या गर्दीत सहभागी झाले होते.

 

तसेच, पाण्यात सुद्धा दारूच्या बाटल्या पडल्या असतील म्हणून तिथे शोधाशोध करण्यासाठी वृद्धांसह लहान मुलांची धडपड या व्हिडीओमध्ये दिसली. ट्रॅक पलटी झाल्यावर त्यातील दारूच्या बाटल्या खाली पडल्याचे पाहून तळीरामांनी चांगलीच संधी साधली. पण त्यांच्यासोबत लहान मुलांचा सहभाग पाहून सर्वांनाच धक्क बसला. एक मुलगा तर चक्क चार-पाच दारूच्या बाटल्या घेऊन जाताना दिसला.

 

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून सारेच जण हैराण झाले आहेत. ‘deepakkulasted’ नावाच्या युजरने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. तसेच, या व्हिडीओवर लोकांनी आपला संतापही व्यक्त केला आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, “चालकाला मदत करण्याऐवजी लोक दारू लुटण्यात गुंतले आहेत.”

Leave A Reply

Your email address will not be published.